महत्वाच्या बातम्या

  जेईई/नीट/एमएचटी-सीईटी २०२३ परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणी करीता ३० जुलै पर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्था कडून जेईई/नीट/एमएचटी-सीईटी-२०२५ या परिक्षेच्या पुर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता ओबीसी/व्हीजेएनटी/एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड मधे उपलब्ध अप्लिकेशन ट्रेनिंग या मोडवर ऑनलाईन पध्दतीने १५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते.

आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करता महाज्योतीने आता जेईई/नीट/एमएचटी-सीईटी-२०२५ पुर्व प्रशिक्षणासाठी नव्याने अर्ज करण्याकरीता तसेच ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश केल्याबाबत व इतर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता विद्यार्थ्यांना ३० जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. टपालाव्दारे, प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.





  Print






News - Gadchiroli




Related Photos