महत्वाच्या बातम्या

 शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यांना गोदाम बांधकामासाठी अनुदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य योजनेंतर्गत जिल्ह्यात अनुदानावर गोदामे बांधण्यात येणार असून त्यासाठी शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.जिल्ह्याला कमाल २५० मेट्रीक टन गोदाम  बांधकाम दोनचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

प्रत्यक्ष  झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल अशा प्रकल्पाकरीता शेतकरी उत्पादक संघ  व कंपन्यांना गोदाम बांधकामाकरीता अनुदान  देण्यात येणार आहे. यासाठी  २५ जुलै पर्यंत संबंधित तालुका कृषि कार्यालयास प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असल्यामुळे अर्जदारांनी प्रस्ताव सादर करतांना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने सदर प्रकल्प मंजुर केल्यानंतरच संबंधित अर्जदारास अनुदान  देण्यात येईल.

यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून अथवा सार्वजनिक विभागाच्या मान्यताप्राप्त डिझाईन्स, स्पेसीफिकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह गोदाम बांधकामाचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील.





  Print






News - Wardha




Related Photos