मासळ बु., तुकूम परिसरात वाघाचे बस्तान, नागरीक दहशतीत


- वनविभाग म्हणते वाघाला पकडण्याचे आदेशच नाहीत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मासळ (बु.)
: ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मासळ बुु., तुकूम परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाने बस्तान मांडले आहे. आज ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मासळ बु. नजीकच्या तलाव परिसरात वाघाने दर्शन दिल्याने नागरीक धास्तावले आहेत.
मासळ बु. परिसरात हा वाघ मागील अनेक दिवसांपासून फिरत आहे. दोन ते तीन दिवसाआधी एका पाळीव जनावराची शिकारसुध्दा या वाघाने केली. दोन आठवड्याआधी मानेमोहाळी परिसरात वाघ दिसून आला होता. यावेळी  वनविभागाने केवळ वाघाला पळवून लावण्याचे काम केले. मात्र परत हा वाघ मासळ बु. परिसरात आज दिसून आला आहे. यामुळे या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. तलावात पाणी असल्यामुळे त्याचा वावर याच परिसरात आहे. याच तलावाजवळ बांबू रिसोर्ट आणि मोगली रिसोर्ट आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. वाघाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या वाघामुळे धोका निर्माण झाला असून वाघाला पकडून सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी होत आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता वाघाला पकडण्याचे आदेशच नसल्याने पळवून लावल्या जात असल्याची माहिती दिली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-04


Related Photos