छत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या हल्यात ४ जवान शहिद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  / रायपूर :
छत्तीसगडमधील कांकेरमध्ये बीएसएफचे जवान आणि नक्षल्यांमध्ये आज  झालेल्या भीषण चकमकीत बीएसएफचे ४ जवान शहीद झाले आहेत , तर आणखी काही जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. कांकेरच्या जंगलात नक्षलवादी आणि बीएसएफचे जवान यांच्यात आज सकाळी चकमक सुरू होती. कांकेर जिल्ह्यातील प्रतापपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहल्ला गावानजीक  जंगलात संशयास्पद हालचाली होत असल्याची खबर बीएसएफ जवानांना मिळाली होती. त्यानूसार जवानांची तुकडी घटनास्थळी गेली असता नक्षल्यांनी अंधाधुंध गोळीबार सुरू केला. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात बीएसएफचे ४ जवान शहीद झाले आहेत. तर काही जखमी जवानांना पखांजूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  Print


News - World | Posted : 2019-04-04


Related Photos