महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जातीच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी बार्टी कटिबध्द : बार्टी महासंचालक  सुनील वारे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे  महासंचालक सुनील वारे यांनी भेट दिली. सर्वप्रथम दिक्षाभूमी येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळयास माल्यार्पण केले. चिंचभवन येथील साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ  स्मारक ट्रस्ट येथे भेट दिली व सुरु असलेल्या कामाची व उपक्रमाबाबत माहीती घेतली.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकरीता NIELIT अंतर्गत G2G तांत्रिक कौशल्यावर आधारीत रोजगारभिमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याकरीता मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिने विभागाच्या उपलब्ध इमारती व परीसराची पाहणी करण्यात आली. भेटी दरम्यान अनेक सामाजिक संघटना, विद्यार्थी शिष्टमंडळांनी भेटी घेतल्या, त्या सर्वांशी चर्चा करुन महासंचालकांनी समस्या एैकूण घेतल्या. अनुसूचित जातीच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाइी बार्टी कटिबध्द असल्याचे सांगून जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात चर्चा झाली. भेटीच्या वेळी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त तथा सदस्य  सुरेंद्र पवार, प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सदस्य सचिव आशा कवाडे तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos