आलापल्ली - भामरागड मार्गावरील तलवाडाजवळ भिषण अपघात, ६ जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
आलापल्ली - भामरागड मार्गावर आलापल्लीपासून १२ किमी अंतरावरील तलवाडा गावाजवळ दुचाकी आणि पिक अप वाहनाचा भिषण अपघात झाला. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. सदर घटना आज ३ एप्रिल रोजी दुपारी १२.३०  वाजताच्या सुमारास घडली.
साईनाथ गुरनुले (४०) रा. चपराळा, समिर कोस सोनपूर (४८) रा. चपराळा, मारोती आंदे (५९) रा. चपराळा, दुचाकीवरील शिवराम लिंगाजी गुड्डीपाका (५२) रा. भामरागड, प्रकाश आंदे चपराळा, अशोक कावळे (४२) अशी जखमींची नावे आहेत. 
बुधवारला भामरागड येथे आठवडी बाजार असल्याने एमएच ३३ जी १६४ क्रमांकाचे पिक वाहन भामरागडकडे येत होते. तर एमएच ३३ एन ३०१० क्रमांकाच्या दुचाकने शिवराम गुड्डीपाका हे आलापल्लीकडे येत होते. दरम्यान दुपारी १२.३०  वाजताच्या सुमारास दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने पिक वाहन पलटले. या घटनेतील जखमींना तातडीने १०८ रूग्णवाहिकेने रूग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-03


Related Photos