खांबाडा येथे ट्रॅव्हल्स मधून ८ लाख ३० हजारांची रोकड जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / खांबाडा (वरोरा) :
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वरोरा स्थानिक गून्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एम एच ४० ए व्हि २०७७ या क्रमांकाच्या डीएनआर ट्रॅव्हल्स मधून ८ लाख ३० हजार ५०० रूपयाची रोकड जप्त केली आहे. सदर रोकड वरोरा येथील तंबाखू विक्रेते तथा महाराष्ट्र राज्य लॉटरी चे विक्रेता अनिल फुलचंद शर्मा यांच्याकडून हस्तगत करण्यात आली . 
निवडणूकिच्या काळामध्ये वाजविपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगण्यास बंदी असताना वरोरा येथून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून रोकड जात असल्याची गोपनीय माहिती वरोरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मांडव ,मदन येरणे, संदिप मिश्रा, प्रदिप राजपूत, पुरूषोत्तम पठारकर यांनी सापळा रचून संशयित ट्रव्हल्स खाबांडा येथे थांबवून झडती घेतली असता वरोरा येथून नागपूर येथे जाणाऱ्या तंबाखू व्यापारी अनिल शर्मा यांचेकडे अंदाजे आठलाख तिस हजार पाचशे रूपयांची रोकड आढळून आली.  याची माहिती तात्काळ वरीष्ठाणा देण्यात आली व रोकड जप्त करण्यात आली.  पुढील तपास सुरु आहे .   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-03


Related Photos