कोंढाळा येथे घर जळून खाक, अडीच लाखांचे नुकसान


- पीडित कुटुंबाची नुकसान भरपाई देण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) : 
कोंढाळा येथील अरुण रामचंद्र अलाम (४०) यांच्या घराला २ एप्रिल रोजी रात्री ७.४५ वाजता च्या सुमारास आग लागल्याने, घरातील सर्व  सामान जळून खाक झाले. या घटनेत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 
  अरुण यांची मुलगी  सविता अरुण अलाम नेहमी प्रमाणे सायंकाळच्या सुमारास देवी-देवतांची पूजा करून दिवा -बत्ती लावुन तुळशी वृंदावना जवळ तिने दिवा लावला होता. अचानकपणे त्या दिव्यातील पणती कुणी घरामध्ये आणली हे घरच्यांना कळलेच नाही व काही वेळातच सर्व घर  आगीच्या विळख्यात सापडले . घराला आग लागताच सर्व घराजवळील माणसे धावून आली व गावकऱ्यांनी पाणि टाकून आग आटोक्यात आणली.  मात्र तोपर्यंत घर व घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते. या आगीमधे सविता हिचा हात काही प्रमाणात जळाला असुन,तीला शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे घरच्यांनी सांगितले. ही घटना घडताच गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांनी        घटनास्थळ गाठून  पाहणी केली .  लगेच त्यांनी देसाईगंज येथील तहसीलदार यांंना घटनेेची माहिती देऊन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,  यासाठी त्यांनी व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.   सकाळच्या सुुमारास मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-03


Related Photos