जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा लाचखोर उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळयात


- कंत्राटदाराकडून  घेतली ६ हजारांची लाच,लाच स्वीकारणारा खाजगी इसमही ताब्यात 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे अखेरचे बिल काढून देण्यासाठी कंत्राटदाराकडून  सहा हजार रूपयांची खाजगी ईसमामार्फत  लाच घेतांना जिल्हा परिषद बांधकाम विभाग धानोराच्या प्रभारी उपविभागीय अभियंत्यास व खाजगी ईसमास लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केल्याची घटना आज २ एप्रिल रोजी धानोरा येथे घडली.प्रभारी उपविभागीय अभियंता हिम्मतलाल जेठालाल रूपारेल (५४) व नरेंद्र रेमाजी भैसारे(४६) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.
दोन्ही आरोपीविरूद्ध धानोरा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार,पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर,गडचिरोलीचे पोलिस उपअधीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवि राजुलवार,पोलिस हवालदार मोरेश्वर लाकडे,प्रमोद ढोरे,नत्त्थु धोटे,सतिश कत्तीवार,सुधाकर दंडिकेवार,देवेंद्र लोनबले,महेश कुवूâडकर,किशोर ठाकुर,सोनी तावाडे,सोनल आत्राम,तुळशीराम नवघरे,घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-02


Related Photos