आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्‍याबदल ६ गुन्‍हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  :
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्या  दृष्टीने आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे गठन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय आचारसंहिता पथक जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याबद्दल कार्यवाही करित आहे. १ एप्रिल पर्यंत आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याबद्दल ६ गुन्हे दाखल झाले आहेत.
यामध्‍ये एमसीसी २४ पथके, स्‍टॅटीक सर्व्‍हेलन्‍स पथक ३९, भरारी पथके २६, चेकपोस्‍टस ३३असून एमसीसी पथकाला आचारसंहिता भंग केल्‍याची ६ प्रकरणे आढळून आली आहेत. या सर्व प्रकरणामध्‍ये कार्यवाही करण्‍यात आली असून एफआयआर ही दाखल करण्‍यात आलेले आहेत. निवडणुक खर्च संनियंत्रण पथक व पेडन्‍युज संदर्भातील एमसीएमसी अंतर्गत अद्याप प्रकरणे दाखल झालेले नाहीत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-02


Related Photos