जबरी चोरी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम जाट (२४) व अनुराध दर्शन वय (२४) दोघेही रा. चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
३१ मार्च रोजी जलनगर वार्डातील रहिवासी क्रिष्णा मंगुर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार लाॅ काॅलेज जवळील वाॅटर फिल्टर जवळ नेवून दोन अज्ञात आरोपीनी मारहाण केली तसेच १ हजार ५०० रूपये रोख व एटीएम कार्ड जबरीने चोरून नेले. दुसरीकडे रात्री १२ वाजता दरम्यान हाॅटेल ट्रायस्टर जवळ फिर्यादी अमोल पारखी रा. चंद्रपूर हे आपल्या कामावरून नातेवाईकासोबत दुचाकीने परत येत असताना दोन इसमांनी त्यांना थांबवून एमआय कंपनीचा मोबाईल, एटीएम कार्ड, राशन कार्ड आणि ३०० रूपये रोख चोरून नेले होते. दोन्ही घटनांची तक्रार दाखल होताच अज्ञात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रामनगर पोलिसांनी तपासादरम्यान काल १ एप्रिल रोजी गोपनिय माहितीच्या आधारे जनता काॅलेज परिसरातून दोघा संशयीतांना दुचाकीसह ताब्यात घेतले. दोघांनीही चोरी केल्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, सहाय्यक फौजदार, जाधव, पोलिस नाईक चिकाटे, किशोर वैरागडे, पोलिस शिपाई राकेश निमगडे यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-02


Related Photos