खूनाच्या प्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेप, प्रत्येकी दोन हजारांचा दंड


- गडचिरोली येथील न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र आर. शर्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. 
सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या राजाराम दुर्गे दोन्ही रा. छल्लेवाडा ता. अहेरी अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हरीनाथ दुर्गे असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे. 
प्राप्त माहितीनुसार सुधाकर राजन्ना दुर्गे हा स्वतःच्या चुलत भावासह अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ११ नोव्हेंबर २०१६ रोजी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास फिर्यादी सुधाकर दुर्गेे याच्या घरासमोर रस्त्यावर उभा असताना विश्वनाथ समय्या दुर्गे हा बैलगाडी जोराने हाकलत नेत होता. यावेळी फिर्यादी सुधाकर दुर्गे याने त्याला हाक मारून बोलाविले. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यानंतर विश्वनाथ आपल्या घरी निघून गेला. रात्री ९.४५  वाजताच्या सुमारास विश्वनाथ हा त्याचा मजवा भाउ हरीनाथ व लहान भाउ सुनिल याला घेवून सुधाकर दुर्गे याला मारण्यासाठी आला. त्यांना येताना पाहून सुधाकर चा भाउ बसवय्या राजाराम दुर्गे याला सोबत घेवून हरीनाथ दुर्गे याच्या पोटात चाकूने वार केला. तसेच त्याचा लहान भाउ सुनिल दुर्गे याला सुध्दा चाकूने भोसकले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेत हरीनाथ दुर्गे याचा मृत्यू झाला. अशा फिर्यादीवरून रेपनपल्ली उपपोलिस ठाण्यात कलम ३०२, ३०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायाधिश सुरेंद्र आर. शर्मा यांनी साक्षपुरावा तपासून आज २ एप्रिल रोजी आरोपी सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या राजाराम दुर्गे यांना जन्मठेपेची शिक्षा तसेच १ हजार रूपये दंड, कलम ३०७ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्त सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.  सदर गुन्ह्याचा तपास उपपोलिस ठाणे रेपनपल्लीचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी काम बघितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-02


Related Photos