महत्वाच्या बातम्या

 सर्पमित्राने दिले ४० सापाला जीवदान


- पावसाळाच्या  सुरुवातीपासून ४० विषारी बिनविशारी व निमविशारी सापांना जीवनदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावातील सरपमित्र प्रणय करमनकर याने सर्पमित्र संदीप जोरगलवार आणि कपिल मसराम  यांच्या मार्गदर्शनात आष्टी परिसरातील गावातील, घरातील वा शेतशिवारातील पावसाळ्याच्या सुरुवातिपासून काळापासून तर आजपर्यन्त ४० सापना जीवनदान दिले आहे. 

परिसरातील जनतेला भितीचे  वातावरण निर्माण न करता सर्प जनजागृती करत सापाना जीवनदान देण्याचे मौलाचे कार्य प्रणय करमनकर करीत आहे आष्टी परिसरातील नागरिक सापला मारण्याचा दुष्ट विचार न करता सापाला जिवंत पकडण्यासाठी संबंधित नागरिक सर्पमित्र प्रणय करमणकरला बोलावतात त्यामुळे तो तत्परटने जाऊन साप पकडून सदर साप चपराळा अभ्यारण्यात सोडून जीवनदान देण्याचे मौलाचे कार्य निस्वार्थपने तो करीत आहे भारतीय संस्कृतित खेड्यात नाग सापाला देव मानले जाते व पूजा ही केली जाते.

साप हा पर्यावरण संतुलन राखणारा एक घटक आहे. त्याचप्रमाणे अन्नसाखळीतील महत्वाचा भाग असल्यामुळे शासन साप बचाव मोहीम राबवत असते. परंतु खेड्यात साप निघाल्यास लोक मारण्यासाठी धावत असतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप आपले घर सोडून अन्न व निवाऱ्यासाठी भटकत असतात आणि लोक वस्तीत येऊन घराचा आसरा घेत असतात.

त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता परिसरातील सर्पमित्राशी संपर्क साधुन सरपमित्राला बोलावून सापाला न मारता त्याला जीवनदान देण्यास मदत करण्याचे आव्हान सर्पमित्र प्रणय करमनकर याने केले आहे आज पर्यन्त प्रणय ने नाग, घोनस, फरसे, मन्यार, धामन, दीवट, तस्कर,मांजर्या, धूळ नागिन, कवड्या,अजगर अशा विषारी, निमविशारी आणि बिनविशारी शेकडो सापाना जीवनदान दिले आहे. 






  Print






News - Gadchiroli




Related Photos