नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या केल्या उद्धवस्त


वृत्तसंस्था / श्रीनगर :  पाकिस्तानच्या या गोळीबारात काल एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर २४ नागरीक जखमी झाले होते. यानंतर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन नागरीवस्त्यांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय सैन्याने  नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्धवस्त केल्या आहेत.
 पाकिस्तानी सैन्याकडून पूँछ, राजौरीमधील नागरीवस्त्यांवर गोळीबार, तोफांचा मारा सुरु होता. यामध्ये एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अनेक नागरीक जखमी झाले होते.   भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचीही जिवीतहानी झाली आहे. पाकिस्तानने आपले तीन सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूँछ आणि राजौरी सीमेवरील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.   Print


News - World | Posted : 2019-04-02


Related Photos