महत्वाच्या बातम्या

 जेष्ठ नागरिकांच्या कष्ट करण्याच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : खा रामदास तडस


- श्री. संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळ, संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटी व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, कारंजा चे संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार सोहळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (कारंजा) : आज आपण जेष्ठ नागरिकांचा सत्कार करीत आहे, परंतु सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांचे महत्व समजून घेतले पाहिजे, समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष असल्यामुळे नेहमीच मार्गदर्शक आणि हितचिंतक राहिलेले असतात, अडचणीच्या वेळी योग्य मार्गदर्शनाचे काम जेष्ठ नागरिक करीत असतात, त्यामुळे जेष्ठ नागरिकांना योग्य मानसन्मान देने आपले कर्तव्य आहे. तसेच जेष्ठ नागरिकांच्या कष्ट करण्याच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतले ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा, आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपले पुढील आयुष्य उज्वल बनवा असे यावेळी खा. रामदास तडस म्हणाले. ते गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलत होते.

कारंजा (घाडगे) येथे श्री. संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळ, संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटी व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, कारंजा चे संयुक्त विद्यमाने भव्य गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार सोहळा स्थानिक साईश्रध्दा सभागृह, कारंजा येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे प्रदेशाध्यक्ष व वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार  रामदास तडस तर प्रमुख पाहुणे माजी खासदार सुरेश वाघमारे, आर्वी विधानसभा आमदार दादाराव केचे, वर्धा लोकसभा निवडणुक प्रमुख सुमित वानखडे, म.प्रा.तै. महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विपीन पिसे, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष देवा निखाडे, नागपुर ग्रामीण अध्यक्ष पुष्कर डांगरे, संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धाचे अध्यक्ष शैलेंद्र झाडे, संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष अरविंद चरडे, आर्वीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, आर्वी पंचायत समितीचे माजी सभापती हनुमंत चरडे, ठाणेगावच्या सरपंच मिनाक्षी रेवतकर, बिहाडीच्या सरपंच भाग्यश्री बोडखे, आष्टी तालुका अध्यक्ष धनराज हिरुडकर, आर्वी तालुका अध्यक्ष गणेश काळमोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम आ. दादाराव केचे व सुमितदादा वानखडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यानंतर दहावी व बारावीच्या तेली समाजातील कारंजा-आर्वी-आष्टी तालुक्यातील तसेच कारंजा तालुक्यातील विविध शाळांच्या प्रत्येकी तिन टॉपर विद्यार्थ्यी एकुण ९५ विद्यार्थ्यांचा सत्कार मोमेंटम व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. त्यानंतर तेली समाजातील जेष्ठ नागरिक सुरेश रामदास भांगे, कृष्णराव लोखंडे, लक्ष्मणराव भांगे, हरी जसुतकर, बाबाराव बारई, सिताराम सरोदे, केशवराव ढबाले, रामदास सरोदे, रामकृष्ण धांदे यांचे शाल, श्रीफळ व जगनाडे महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आले. विशेष सत्कार हेमलता वंजारी डैब सुवर्णपदक, विपुल ढोले राष्ट्रीय तबला वादन विजेता, लक्ष्मी घुग्गुसकर राष्ट्रीय व्हॉलीबॉल पटू, स्वरा ठोंबरे नवोदय विद्यालय निवड यांचेही शाल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

मार्गदर्शनपर भाषणात रामदास तडस, दादाराव केचे व सुमित वानखेडे यांनी समाजाचे संताजी भवनाकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही दिली. सुरेश वाघमारे यांनी सामाजिक समस्यांवर मंथन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश काळबांडे, आभार प्रदर्शन सचिव रामेश्वर सरोदे तर संचालन माधुरी जसुतकर यांनी केले. याच कार्यक्रमात माधवराव जसुतकर व आनंदराव चाफले यांनी सभागृह जागा खरेदी व बांधकामासाठी ५१ हजार रुपयांचे योगदान जाहीर केले. कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे यशस्वीते करीता सुदिप भांगे, किशोर भांगे, सुनिल वंजारी, अरुण चापले, भागवत लोखंडे, दिलीप जसुतकर, सोहन टुले, कमलेश कठाणे, संजय मस्की,  राजेंद्र वंजारी, रमेश चाफले, मोहन सावरकर, सुमित बारई, रोशन भांगे, राहुल भांगे, प्रितम भस्मे, रवी वाघमारे, नरेश चाफले, अजय कावडकर, रुषाली भांगे, रुतुजा धांदे, देवयानी काळबांडे, कोमल वंजारी ईत्यादींनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Wardha




Related Photos