एका ट्रक चालकाची मुलगी बनली कृषी अधिकारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वणी   :
घरात अठराविश्व दारिद्र्य, आई मोलमजुरी करून चूल पेटवायची, वडील ट्रक चालवून    कुटुंबाला आधार लावायचे.  महागाईने होरपळलेल्या परिस्तिथीतीत मुलांना शिक्षण देणे म्हणजे तारेवरची कसरतच. परंतु यावरही मात करत  सुनीता  प्रकाश कुईटे  वणी जि यवतमाळ यांची मुलगी  हर्षाली कुईटे हिने नुकतीच कृषी अधिकारी पदाची  परीक्षा उत्तीर्ण करून बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये कृषी अधिकारी  या पदावर निवड झाली. 
 शिकण्याची जिद्द आणि ठरविलेले ध्येय निश्चित मार्गापर्यंत पोहचवते  हे यातून  सिद्ध होते.  आई मजुरी करून चूल चालवायची.  वाचलेली दमडी तिच्या शिक्षणासाठी द्यायची.  मी माझ्या पोरीला नोकरीला लावणार असे  उराशी स्वप्न बांधून ठेवलेले आज तिचे स्वप्न  पुर्ण झाले . नक्कीच अशा  निश्चित ध्येयापर्यंत पोहचणारे मुले असो की मुली हे आजच्या बेरोजगारांना आदर्शच मानावे लागेल.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-02


Related Photos