पबजी गेम खेळण्यास आईचा विरोध, मुलाने घरच सोडले


वृत्तसंस्था / मुंबई : भिवंडी  शहरातील वऱ्हाळादेवी मार्गावरील मानसरोवर या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलास पबजी गेम खेळण्यास आईने विरोध केल्याने त्याने घर सोडल्याची घटना गुरुवारी घडली .  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रविवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर राजेंद्र गुळुंजकर (१७) असे मुलाचे नाव असून, तो नेहमी मोबाइलवर पबजी गेम खेळत असल्याने त्याच्या काळजीपोटी आई त्याला रागावली. त्यामुळे तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर, त्याच्या आईने मयूरला परत आणण्यासाठी भिवंडी रोड रेल्वेस्टेशनवर त्याच्या बहिणीस पाठवले. रेल्वेस्टेशनवर पोहोचल्यानंतर बहिणीने मोबाइलवर मयूरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रेल्वेस्टेशनजवळ उभ्या असलेल्या त्याच्या दुचाकीवर मोबाइल व दुचाकीची चावीही आढळून आली. त्याच्या बहिणीने मयूरला शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही. मुलगा सज्ञान नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंताक्रांत झाले असून, त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-02


Related Photos