१२ सराईत गुन्हेगार, अवैध दारूतस्करांवर तडीपारीची कारवाई


- चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकांची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सराईत गुन्हेगार व दारू तस्करांवर विशेष कार्यवही कारीत १२ जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. त्यांच्यावर कलम ५६, ५७ मुंबई पोलिस कायद्यानुसार आदेश पारीत करण्यात आले आहे.
पोलिस स्टेशन वरोरा अंतर्गत मनोहर दांडेकर रा. यात्रा वार्ड वरोर, साजीद अजीज शेख रा. कालरी वार्ड वरोरा, राजु उर्फ राजेश शंकर वाटमोडे रा. नागरी वरोरा, शेखर इब्राहीम शेख आजम रा. टेमुर्डा, सुभाष कालु पवार रा. यात्रा वार्ड वरोरा या आरोपींना ३० मार्च २०१९ अन्वये ३ ते ६ महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 
पोलिस ठाणे घुग्घुस अंतर्गत सलीम नईमुद्दीन खान (२४) रा. अमराई वार्ड घुग्घुस याला ६ महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यांतर्गत भारती उर्फ स्नेहा उर्फ मुस्कान सुरेश खैरे (२५) रा. नुरानी मस्जीद जवळ भिवापूर चंद्रपूर हिला ६ महिने हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस ठाणे चिमूर अंतर्गत जगदिश आनंदराव रामटेके रा. मालेवाडा ता. चिमूर, याला चार महिने, भद्रावती पोलिस ठाण्यांतर्गत प्रविण मंगल कटारे याला १ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस ठाणे सिंदेवाही अंतर्गत माणिक वासुदेव गेडाम (४०)  रा. आंबेडकर वार्ड सिंदेवाही याला ४  महिन्याकरीता आणि धमेंद्र देवाजी मेश्राम (४०) रा. नवरगाव सिंदेवाही यास ४ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-02


Related Photos