महत्वाच्या बातम्या

 रापम ‌अहेरी आगाराची दुरावस्था : आगारातील कर्मचारीवर्ग त्रस्त 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : रापम ‌अहेरी आगाराची दुरावस्था झाली असल्याने येथील कर्मचारी वर्गाला मोट्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अहेरी आगारातील उपलब्ध वाहन हे आरटीओ यांच्या नियमांचे उल्लंघन करून वाहते. यामध्ये प्रामुख्याने वाहन गळती असणे, वाहनाचे मुख्य लाईट अतिशय कमजोर असणे, खिळखिळ वाजणे, वाहनांना प्रवाशी खिडक्या नाहीत, टायर पंचर झाल्यास वेळीच टायर बदली करण्यास टूल किट उपलब्ध नसणे, चालकासमोरील मोठा काच अतिशय खराब असणे या सर्व कारणांमुळे आणि मुखत्वे अहेरी आगार अंतर्गत येणारे सर्वच मार्गाची दुरावस्था झाली असल्यामुळे मोट्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचे पुनर्सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. या मार्गांमुळे मोट्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा मार्ग अतिशय खराब असल्यामुळे येथील गाड्या नियोजित वेळेवर सोडत नाहीत. त्यांना नियोजित वेळेच्या एक दोन तास वेळ लागतो. त्यामुळे चालक वाहकाच्या आरोग्याचा समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे कामगारांचे आयुष्य घटत आहे.
आगारातून पुरेशी यांत्रिक सुविधा नसल्यामुळे वाहनाचे दुरुस्तीचे काम वेळेवर होत नाही. परिणामी नियोजित वेळेवर वाहने निघत नाहीत. याचा देखील परिणाम कर्मचारांच्या कुटुंबावर होत आहे.
त्यामुळे या सर्व समस्या सोडवण्यात यावा, व सर्व समस्यांचे निराकरण त्वरित करून प्रवाशांची उत्कृष्ठ सेवा करण्याकरिता मदत करण्यात यावी.
या सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास निवेदनाच्या सात दिवसानंतर आगारामध्ये कोणतेही कर्मचारी चालक वाहक काम करणार नाही.





  Print






News - Gadchiroli




Related Photos