नियंत्रन रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद, पाच वर्षीय मुलीचा मृत्यू


वृत्तसंस्था / श्रीनगर : नियंत्रन रेषेवर   पाकिस्तानने आज पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. तसेच या गोळीबारात एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत चार जवान जखमी झाले आहेत. 
आज सकाऴापासूनच पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेला लागून असलेल्या मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने शस्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात भारताचे पाच जवान जखमी झाले. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान,  या गोळीबारात एका पाच वर्षीय मुलीचाही मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्ह्याचे डीडीसी राहुल यादव यांनी दिली. 



  Print






News - World | Posted : 2019-04-01






Related Photos