महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरमध्ये रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी आज करण्यात आले.

सहायक विभागीय अभियंता, मध्य रेल्वे, बल्लारशाह यांच्या कार्यालयात सुबोध कुमार यांनी सर्व कागदपत्रे तपासून करून मध्य रेल्वे, नागपूरच्या DRM कार्यालयात पाठविणार आहेत.

यावेळी अजय दुबे, NRUCC सदस्य, रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिनिधी म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले की, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार वादग्रस्त जमिनीची संयुक्त मोजमाप रेल्वे व राज्य प्रशासनाने करावे व त्याचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर करावा. त्यानंतर त्यांच्या निर्णयावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. तोपर्यंत रेल्वे प्रशासनाने कोणतेही घर पाडण्याची कारवाई करू नये. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यात बैठकीत रेल्वे प्रशासनाला कोणत्याही घराला हात लावू नका, असा इशारा दिला होता. या संदर्भात उत्तम मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उच्च पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी मिथिलेश पांडे जिल्हा भाजयुमो महासचिव, श्रीकांत उपाध्याय विदर्भ प्रदेश सचिव भाजपा कामगार मोर्चा, अशोक सोनकर जिल्हा सचिव भाजपा कामगार मोर्चा, भाजपचे ज्येष्ठ नेते शेख लाल यांची प्रमुख उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos