पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत : मोदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : 
 'पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत. कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे.   पवारांवर टीका करताना, नरेंद्र मोदी  यांनी भारतीय जनता पक्षाने भल्याभल्यांना मैदानातून पळवून लावल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी पवारांना टोला लगावला. शरद पवारांवर चौफेर हल्ला चढवताना, 'शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली' असे जोरदार टोला मोदी यांनी पवार यांना लगावला. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खूप मोठे कौटुंबिक युद्ध सुरू झाले आहे. शरद पवार यांच्या हातातून पक्ष निसटत चालला आहे. आता हळूहळू पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहात असे असे अजित पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले. कौटुंबिक युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारांना तिकिटे देण्यातही अडथळे आले. कोणाला कुठली जागा द्यावी, कुठून लढावे हा मोठा प्रश्न पवारांपुढे उभा राहिला. यामुळे पक्षातील इतर नेत्यांचे धैर्य समाप्त झाल्याचेही मोदी म्हणाले. 



  Print






News - Wardha | Posted : 2019-04-01






Related Photos