महत्वाच्या बातम्या

 १७ जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न्न मांडण्यासाठी व्यापीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यादृष्टीने महिलांच्या तक्रारी अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी,

यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.१७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १.०० वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. त्यात महिलांच्या १२ ते १ वाजेपर्यत महिला लोकशाही दिनी तक्रारी स्किारण्यात येणार आहे.

तसेच महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरिता तक्रार अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, शिवाजी क्रिडा संकूल, बस स्टॅाप जवळ, भुविकास बॅक भंडारा येथे उपलब्ध आहे.

जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करताना अर्जासोबत जिल्हाधिकारी यांना उद्देशुन अर्ज, तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्र. असल्यास प्रत, महिला लोकशाही दिनात न्याय प्रविष्ट प्रकरणे सेवा विषयक आस्थापना विषयक निवेदन स्वरुपाच्या तक्रारी स्विकारण्यात येणार नाहीत.असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos