महत्वाच्या बातम्या

 रोजगार मेळाव्यातून ३५७ उमेदवारांची प्राथमिक निवड


- इंद्रप्रस्थ महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

-  सीइओ रोहन घुगे यांच्याहस्ते मेळाव्याचे उद्घाटन

- शासन आपल्या दारी उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ५०९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून १३ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय व इंद्रप्रस्थ न्यु आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने इंद्रप्रस्थ महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी.भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग अधिकारी गरुड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्वेता कुलकर्णी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड, इंद्रप्रस्थ न्यु आर्ट सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.आशिष ससनकर उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजगार मिळवण्याचा मार्ग सुकर झाले असल्याचे प्रतिपादन रोहन घुगे यांनी मेळाव्याच्या उद्घाटनपर भाषणात केले. तर रोजगार मिळवण्यासाठी कौशल्युक्त  मनुष्यबळाची आवश्यकता आहे. असे डॉ. आर.जी.भोयर म्हणाले.

रोजगार मेळाव्यात राज्यातील विविध भागातून उत्पादन तसेच सेवा क्षेत्रातील नाईट पेट्रोल सेक्युरीटी सर्विस नागपूर, विजयश्री फेब्रीकेशन वर्धा, सखी गारमेंट, लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन, उत्कर्ष र्स्माल फायनान्स बँक, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, धुत ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर, सनसुर सृष्टी इंडिया प्रायवेट लिमिटेड वर्धा, पिपल ट्री व्हेंचर्स पुणे, पटले एज्युकेशन स्कील फॉऊडेशन नागपूर, एरोस ह्युंदई मोटर्स वर्धा, एस.एस.कॅरेमन प्लेसमेंट, द युनिवर्सल ग्रुप असोसिएट नागपूर,  प्रकाश इलेक्ट्रीक, नवभारत फर्टीलायझर अमरावती, मोनाली एंटरप्रायझेस पुणे, प्लेस अशुर्ड कन्सल्टंट नागपूर, सहयोग मल्टीस्टेट  को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी अशा १९ कंपन्यांनी सहभाग नोंदवून त्यांच्या कडील असलेल्या  १ हजार ६११ रिक्त पदासाठी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निता औघड यांनी केले. संचालन प्रा. संदिप पेटारे यांनी तर आभार धीरज मनवर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कौशल्य विकास विभागाचे रुपसिंग ठाकूर, रुपेश रामगडे, सागर आंबेकर, अतुल वरेकर, सुवर्णा थेरे तसेच महाविद्यालयाचे प्राद्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.





  Print






News - Wardha




Related Photos