महत्वाच्या बातम्या

 गोदाम बांधकामासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन २०२३-२४ अंतर्गत धान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मूल्य वृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची व्यवस्था नाही, अश्या ठिकाणी गोदामाचे बांधकाम करावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात व कडधान्य कार्यक्रमानुसार जिल्ह्यास ३ गोदाम बांधकाम घटकाचे लक्षांक प्राप्त आहे.

२५० मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किवा जास्तीत जास्त रुपये १२.५० लक्ष या पैकी जे कमी असेल ते अनुदान अनुदेय राहील. वरीलप्रमाणे योजने करिता सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्ड च्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी एफपीओ / एफपीसी अर्ज करू शकतील. तरी इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्यात यावा. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ब. भी. मास्तोळी यांनी आवाहन केलेले आहे. अटी व शर्थी पुढीलप्रमाणे आहे. गोदाम बांधकाम करिता उत्पादक संघ, कंपनी एफपीओ / एफपीसी अर्ज करू शकतील. कमीत कमी २५ लाख चे प्रस्ताव असणे आवश्यक. गोदाम बांधकाम कर्ज मंजुरी करिता बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र. गोदाम बांधकाम प्रस्तावास बांधकाम विभाग कडून तांत्रिक मंजुरी.





  Print






News - Gadchiroli




Related Photos