ट्रॅक्टरची रस्ता दुभाजकाला धडक, चालकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगाव :
वणी राज्य महामार्गावरील  दुभाजकाला ट्रॅक्टरची  धडक बसल्याने चालकाचा उपचारादरम्यान नागपुर येथे  काल ३० मार्च रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली.
रितेश मोहण ढुमणे (२९ )असे मृतकाचे नाव असुन २८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान शेतातील टमाटर भरुन मांगरुळला जात असताना  चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टर दुभाजकावर  धडकले. या अपघातात रितेश मोहण ढुमणे  हा गंभिर जखमी झाल्याने उपचारार्थ नागपुर येथे हलविण्यात आले. परंतु  ३० मार्च रोजी रात्री रितेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत असुन,त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी मुलगा व आप्तपरिवार आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-03-31


Related Photos