गळफास लावून इसमाची आत्महत्या, कुरुड येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
तालुक्यातील कुरुड येथील इसमाने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज   ३१ मार्च रोजी घडली.  आसाराम पंढरी कामळी (३५) असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 
 आसाराम  कामळी  हा कुरुड येथील कामळी मोहल्ल्यात राहत होता. पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्याची पत्नी  लघु शंकेकरिता उठली असता तिला पती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आला.  यानंतर तिने  आरडाओरड करून सर्वांना माहिती दिली. काही वेळातच कुरुड येथील पोलीस पाटील मडावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर माहिती देसाईगंज पोलिसांना दिली. आसाराम याच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असुन ३ ते ४ वर्षांची मुले आहेत. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-31


Related Photos