महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही पंचायत समितीच्या शिक्षण विषयतज्ज्ञावर विनयभंगाचा गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत विषयतज्ज्ञावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा. भारत मेश्राम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विषयतज्ज्ञाचे नाव आहे.

सिंदेवाही तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही सिंदेवाही येथे शिक्षणाकरिता किरायाच्या घरात आपल्या लहान भावासोबत राहते. मागील तीन वर्षांपासून तालुका स्तरीय निबंध स्पर्धा व प्रश्न मंजूषा परीक्षा देत होती. ही परीक्षा सिंदेवाही पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत शिक्षणतज्ञ म्हणून कार्यरत असलेले प्रा. भारत मेश्राम हे घेत होते. या परीक्षेत ती मुलगी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिचा सत्कारही  मेश्राम यांनी केला होता.

त्यातून तिची ओळख भारत मेश्राम यांच्यासोबत झाली. त्या मुलीचा भाऊ शाळेत गेला होता. ती मुलगी एकटीच होती. सायंकाळीच्या सुमारास प्रा. भारत मेश्राम याने फोन केला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक पाहिजे यावर चर्चा करायची असल्याचे सांगून खोलीवर आला. ती एकटीच होती. तुला कपडे घेऊन देतो असे म्हणत त्याने विनयभंग कोला. तिने हा प्रकार आपल्या आईवडीलांना सांगितला. त्यानंतर याची पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून  त्यांना ताब्यात घेतल आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos