महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : मरेगाव (तुकुम) येथील व्यसनमुक्ती गाव समितीने पकडली अवैद्य दारू


- पोलिसांना केले पाचारण

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : मरेगाव (तुकुम) येथे अवैद्यरित्या दारू विकत असलेल्या एका इसमाला गावातील व्यसन मुक्ती गाव समिती ने पकडले. ही घटना मंगळवार  च्यासायंकाळी समोर आली.

प्राप्त माहितीनुसार सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथे गावात दारू विकण्यास बंदी चे ठराव मागील सहा ते सात महिन्या आधी ग्राम पंचायतच्या सभेत ठेवण्यात आले होते. त्याला सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तेव्हा पासुन गावात दारू विक्रीला बंदी करण्यात आली. परंतु, मागील काही दिवसांपासुन गावात दारू आणून विकत असल्याची माहिती वेसन मुक्ती गाव समिती मरेगाव (तुकुम) यांना मिळाली. त्याआधारे मंगळवार ११ रोजी समिती चे पदाधिकारी तसेच सदस्य, सरपंच, सदस्य, गावातील महिला वर्ग व युवक वर्गाने गावात बाहेरुन कोन दारू आणून विकत आहे यावर लक्ष ठेवले होते. दरम्यान, गावालगत असलेल्या धानोरा येथील कान्हू जयराम दूधकुळे वय ६५ हा गावात दारू विकत असल्याचे दिसुन आला. त्याला पकडून गावकऱ्यांनी तपासणी केली असता, त्याच्याकडून देशी दारू च्या आठ बॉटल्या मिळून आल्या. याची माहिती गावकऱ्यांनी सिंदेवाही पोलिसांना दिली. त्यावरून सिंदेवाही पोलिसांनी मरेगाव येथे पोहचुन योग्य तो पंचनामा करुन कान्हू दूधकुळे याला आपल्या ताब्यात घेतले.

यावेळी व्यसन मुक्ती गाव समिती मरेगाव चे अध्यक्ष देवानंद सहारे, उपाध्यक्ष निराशा कुंभरे, सदस्य रेवन बोरकर, अमोल कावडकर, कलीम पठाण, सरपंच संदीप ठाकरे, गावचे प्रतिष्टित नागरिक विजय मसराम यांच्यासह अनेक महिला, पुरूष व युवक वर्ग उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos