दुसऱ्या टप्प्याअंतर्गत दहा मतदारसंघात १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  :
लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत राज्यातील दुसऱ्या टप्प्याअंतर्गत दहा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या २७८ पैकी ९९ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती २७८ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीत २७८  पैकी ९९ उमेदवारांनी माघार घेतली. 

मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या  

बुलढाणा  12
अकोला 11
अमरावती 24
हिंगोली 28
 नांदेड 14 
परभणी 17
बीड 36
उस्मानाबाद 14
लातूर 10 
सोलापूर   13  

तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज ११ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघात कालपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. आज सहा मतदारसंघात ११ तर आजपर्यंत ९ मतदार संघात २० उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 

मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या 

 जळगाव मतदार संघात आज १ (आजपर्यंत २ उमेदवार), औरंगाबाद ३ (४), रायगड २ (४), सातारा १ (१), कोल्हापूर २ (२) आणि हातकणंगले मतदारसंघात आज २ उमेदवारांनी तर आजपर्यंत ४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

तीन मतदारसंघात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही मात्र आजपर्यंत ३  उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये रावेर, जालना आणि सांगली मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात आतापर्यंत एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-30


Related Photos