महत्वाच्या बातम्या

 मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जनतेस आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व मतदार यादीचे शुध्दीकरणासह लोकशाही मजबूत करण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी हरिश भामरे केले आहे.

भारत निवडणूक आयोग यांनी १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ जून ते १६ ऑक्टोबर या कालावधीकरीता जाहीर केलेला आहे. त्यानुषंगाने नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरीकांनी नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच १ जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या संभाव्य मतदारांनी किंवा ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही अशा सर्व नागरिकांनी ओळखपत्र, आधारकार्ड, रहिवास पुरावा, नात्यातील किंवा शेजारी राहणाऱ्या मतदाराचे इपीक कार्ड इत्यादी कागदपत्रासह फॉर्म नंबर सहा भरुन आपले नांव मतदार यादीमध्ये नोंद करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार यादीतून नांव कमी करणे - मयत झालेले मतदाराचे नातेवाईक यांनी मृतकाचे मृत्यू प्रमाणपत्रासह फॉर्म नंबर ७ भरुन मतदार यादीतून नांव कमी करुन घ्यावे. तसेच स्थलांतरीत मतदार तसेच ज्या मुलींचे विवाहानंतर स्थलांतरण झाले आहे अशा सर्व मतदारांनी नविन वास्तव्याच्या पुराव्यासह फॉर्म नंबर ७ भरुन मतदार यादीतून नांव कमी करुन घ्यावे. तसेच मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिक नोंदी असलेल्या मतदारांनी सुध्दा फॉर्म नंबर ७ भरुन मतदार यादीतून स्वत:चे एक नांव कमी करुन घ्यावे.

विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती करणे, मतदाराचा रहिवास पत्ता बदलेला असल्यास पूर्वीच्या पत्त्यावरील नांव वगळून सध्याच्या पत्त्यावर स्थलांतरीत करणे, विद्यमान मतदार यादीतील नांव, लिंग, जन्मतारीख/वय, नात्याचा प्रकार. नात्याचे नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक व छायाचित्र दुरुस्त करणे, कुठल्याही दुरुस्तीशिवाय मतदार ओळखपत्र बदलून घेणे तसेच दिव्यांग व्यक्ती यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्रासह अर्ज करुन दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करणे इत्यादींसाठी मतदारांनी आवश्यक कागदपत्रासह फॉर्म नंबर ८ भरुन दुरुस्ती करुन घ्यावे.

मतदार यादीतील छायाचित्राची (फोटो) गुणवत्ता वाढविणे. ज्या मतदारांचे विद्यमान मतदार यादीत फोटो नसेल किंवा अस्पष्ट फोटो असेल अशा सर्व मतदारांनी कलर पासपोर्ट फोटोसह फॉर्म नंबर 8 भरुन मतदार यादीत फोटो समाविष्ट करुन घ्यावे. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणी करणे ज्या मतदार यांनी अद्यापही - मतदार ओळखपत्राशी आधार कार्डची जोडणी करुन घेतलेली नाही अशा सर्व मतदारांनी फॉर्म नंबर सहा-ब मध्ये आधार क्रमांक नमूद करुन अर्ज करावा.

नागरिकांनी त्यांचे स्वत:चे मोबाईलमध्ये Voter Helpline App डाउनलोड करुन तसेच vsp.in व voter portal या पोर्टलवर जाऊन सुध्दा वरीलप्रमाणे सर्व प्रकारचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos