पाथ्री शिवारात तरुणाची विहीरीत उडी मारून आत्महत्या


तालुका प्रतिनिधी / मारेगाव : शहरापासुन ३ कि.मी.अंतरावर  पाथ्री लगत असलेल्या शेतात मारेगाव येथील विवाहीत युवकाने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या  दरम्यान उघडकीस आली.
  विकास गोविंद रायपुरे (३२) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असुन तो मारेगाव येथील प्रभाग क्रमांक ११ मध्ये कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. दरम्यान २९ मार्च रोजी सकाळी तो बाहेर जातो असे सांगून गेल्यानंतर संध्याकाळी घरी परत आला नसल्याने कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरू होता. आज सकाळी स्वतःचे शेतातील विहीरीत विकासचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मारेगांव पोलिसांना देताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.  त्याच्या मागे पत्नी, एक मुलगी,आई व मोठे बंधु आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.  आत्महत्येचे कारण कळले नसुन पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-03-30


Related Photos