गडचिरोली शहरात डूकरांचा हैदोस, नागरीक त्रस्त, नगरपालिकेचे दूर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
काही दिवसांपूर्वी नगर पालिकेच्या वतीने एक पथक बोलावून काही डूकरे पकडण्यात आली होती. मात्र एकदा मोहिम राबवून नगर परिषद प्रशासन स्तब्ध बसत असल्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली असून विविध वार्डांमध्ये डूकरांच्या हैदोसामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.
शहरातील विविध वार्डांतील गल्लीबोळात मोठमोठ्या कळपाने लहान - मोठी डुकरे फिरत असतात. यामुळे लहान मुले, वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अनेकदा ही डूकरे नागरीकांच्या अंगणात प्रवेश करून घाण पसरवित असतात. नालीतील चिखलात लोळून तसेच इकडे - तिकडे हुंदडत असतात. यामुळे नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील कोणत्याही गल्लीत गेल्यास डूकरांचा सामना करावा लागतो. डूकरांचे मालक केचळ डूकरे विक्री करताना पकडतात. यावेळी गल्लीबोळातून डूकरांना पळविले जाते. अशावेळी लहान बालके, वाहनधारक रस्त्यावर डूकरांच्या कळपात सापडण्याचा व अपघात होण्याचा धोका आहे. मात्र नगर पालिकेकडून केवळ एकदा कारवाई करून सोडून दिले जात आहे. यामुळे नागरीकांनी नगर पालिकेच्या कारभाराप्रती चांगलाच रोष व्यक्त केला आहे. तातडीने मोकाट डूकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-03-30






Related Photos