काश्मीरमध्ये सीआरपीएफ च्या ताफ्याला कारची धडक : 'पुलवामा'ची पुनरावृत्ती टळली?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था /श्रीनगर : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बनिहाल येथे एका गाडीमध्ये आज ३० मार्च रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास स्फोट झाला. यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, हा स्फोट झाला, तेव्हा 'सीआरपीएफ'च्या वाहनांचा ताफा त्याच रस्त्यावरून जात होता. 'सीआरपीएफ'च्या वाहनांचा ताफ्यातील शेवटच्या गाडीला बनिहालजवळ एका सॅन्ट्रो गाडीने मागून धडक दिली व त्यात ती गाडी जळून खाक झाली. त्यामुळे पुन्हा एकदा पुलवामा येथे 'सीआरपीएफ'च्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा प्रयत्न होता का ? अशा चर्चांना उधाण आले आहे.
त्या गाडीतून एक सिलिंडरही सापडला आहे .कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 'सीआरपीएफ'च्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे, पण सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
News - World | Posted : 2019-03-30