आरमोरी - शिवणी मार्गावर ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू, एक गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
ट्रॅक्टरसमोर आलेल्या बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात विटाने भरलेला ट्रॅक्टर उलटून    झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना आज २९ मार्च रोजी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान आरमोरी-शिवणी मार्गावर घडली. विजय राजेश जौंजाळकर (३५) रा. आरमोरी असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. तर लिलाधर सत्यवान डहाके (३५) रा. आरमोरी हा  गंभीर जखमी झाला  आहे.
प्राप्त  माहितीनुसार आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर चालक विजय जौंजाळकर व त्याचा साथीदार यांनी आरमोरीवरून आयसर कंपनीच्या नवीन ट्रॅक्टरने विटा भरून शिवणी येथे जात होते. दरम्यान डोंगरीजवळील एका वळणावर बैल आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये ट्रॅक्टरचालक विजय जौंजाळकर याचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार लिलाधर डहाके गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. आरमोरी पोलिसांनी मृतक   वाहन चालकाविरोधात भादंवी २७९, ३०४ (अ), ३३८ कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदर अपघाताग्रस्त नवीन ट्रॅक्टर चिलबुले यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-29


Related Photos