वनवा लावून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रयत्नात असलेले ९ जण वनविभागाच्या ताब्यात


- आलापल्ली वनपरीक्षेत्रातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
राखीव वनामध्ये अवैधरित्या, विनापरवानगीने प्रवेश करून वनवनवा लावून वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ९ जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. सदार कारवाई आलापल्ली वनपरीक्षेत्रांतर्गत कक्ष क्रमांक १२  मध्ये काल २८  मार्च च्या रात्री ११.३०  वाजताच्या सुमारास करण्यात आली.
साईनाथ सदाशिव तलांडे, संदिप शामराव मडावी, दिलीप मुसली मडावी, बाजीराव सदाशिव तलांडे, अविनाश विठ्ठल मेश्राम, भास्कर मंतु पेंदाम, बापू शंकर वेलादी, विनोद गंगा कोडापे, विकास समय्या आत्राम अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
आलापल्ली परीक्षेत्रातील वनवनवा नियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचारी रात्री गस्तीवर असताना ९ जण संशयास्पदरित्या आढळून आले. आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७  व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२  मधील तरतूदीनुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना प्रथम वर्ग न्यायाधिश अहेरी यांच्या समोर उभे केले जाणार आहे.
सदर कारवाई उपवनसंरक्षक सी.आर. तांबे उपविभागीय वन अधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी किरण पाटील, क्षेत्र सहाय्यक योगेश शेरेकर, वनरक्षक डी.एस. चिव्हाणे, वनरक्षक आर.एस. मडावी यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-29


Related Photos