महत्वाच्या बातम्या

 श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती : दिल्ली आणखी एका भयंकर हत्येमुळे हादरली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : एका महिलेच्या निर्घृण हत्येमुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे. दिल्लीतील गीता कॉलनीमधल्या फ्लायओव्हर जवळ तुकडे तुकडे केलेला मृतदेह सापडला. सकाळी सवा नऊच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती.

मृतदेहाचे तुकडे करून प्लॅस्टीकच्या बॅगेत भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एका प्लॅस्टीकच्या पिशवीत महिलेचे डोके सापडले आहे तर दुसऱ्या पिशवीत तिचा मृतदेह असे पोलिसांनी सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी महरौली भागात श्रद्धा वालकर हित्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते. तिच्याही मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा आरोपी आफताब पूनावाला याने प्रयत्न केला होता. ही महिला कोण आहे. याचा अजून उलगडा लागला नसून पोलीस तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत सापडले होते. हे सगळे तुकडे एकत्र करण्यात येत असून, बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारीच्या आधारे या महिलेची ओळख पटवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. या महिलेला कोणी मारले? का मारले? याचा शोध घेणे अद्याप बाकी आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही खंगाळण्यास सुरूवात केली आहे. या महिलेचे वय अंदाजे ३५-४० वर्षे असावे असा अंदाज आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी या घटनेबाबत एक ट्विट करत दिल्लीत एकामागोमाग एक खून का होत आहे असा प्रश्न विचारला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos