महत्वाच्या बातम्या

 देवळी येथे ई-हक्क आज्ञावलीबाबत तलाठी, सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्यावतीने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या मदतीने ई-हक्क आज्ञावली तयार करण्यात आली आहे. या आज्ञावलीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या आज्ञावलीद्वारे कोणत्याही व्यक्तीला किंवा खातेदाराला तलाठी कार्यालयाकडे न जाता घरी बसून ऑनलाईन पध्दतीने आठ प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

या ई-हक्क आज्ञावलीची प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसिल कार्यालय देवळी येथे सर्व तलाठी, बँक प्रतिनिधी व सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने माहिती तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी शाहजाद शेख, महाआयटी व्यवस्थापक प्रतिक उमाटे यांनी उपस्थित राहुन प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणानंतर सर्व तलाठी, आपले सरकार केंद्रचालक, बँक प्रतिनिधी यांना येणाऱ्या विविध अडचणी समजून घेण्यात आल्या. प्रशिक्षणात आपले सरकार केंद्र चालकांनी आपले लॉगईन आयडी तयार करून जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ घेता येईल यादृष्टीने प्रयत्व करावे तसेच सर्व बँक प्रतिनिधी यांनी त्यांचे स्तरावरील लॉग इन आयडी तयार करून त्यांचेकडील बोजा चढविणे, कमी करणे व ई-करार नोंदीबाबत ऑनलाईन पद्धतीने कार्यवाही करावी, अशा सुचना करण्यात आल्या.

ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज केल्यास अर्जदारास अर्जाची स्थिती प्रत्येक टप्यावर तपासता येते, तलाठ्यांना पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यां एमआयएसद्वारे यांच्या प्रगतीचा आढावा घेता येतो. याद्वारे महसूल प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता येण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत यात आठ प्रकारचे अर्ज करता येतात. त्यात वारस नोंद, बोजा दाखल करणे व कमी करणे, ई-करार नोंदी, मयताचे नाव कमी करणे व एकत्र कुटुंब पुढारी कमी करणे व विश्वस्तांचे नाव कमी करता येणार आहेत.

जास्तीत जास्त खातेदार व नागरिकांनी ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सचिन यादव यांनी केले आहे. बोझा फेरफार घेताना तांत्रिक अडचण येत असल्याने बोझा फेरफार दाखल करणे व कमी करणे सद्यस्थितीत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारून निकाली काढले जात आहे. प्रशिक्षणवेळी उपविभागिय अधिकारी गणेश खताळ, तहसिलदार सचिन यादव, अप्पर तहसिलदार दत्तात्रय जाधव, नायब तहसिलदार डॉ. एस.आर पाराजे उपस्थित होते.   





  Print






News - Wardha




Related Photos