महत्वाच्या बातम्या

 चर्मकार समाजाकरिता विविध कर्ज योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार मोची तसेच इत्यादी यांची आर्थिक शैक्षणिक व समाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळा मार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या व  केंद्र, शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. ही योजना राबविण्यात येत असून ४ हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आलेले आहे.

एन.एस.एफ.डी.सी.नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस १ लाख रुपये, १ लाख ५० हजार व २ लाख, चर्मोद्योग २ लाख, लघुऋण वित्त येाजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी ५० हजार या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरीता २२.२१ कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे.

तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी यांच्या मुदती कर्ज योजना अंतर्गत स्मॉल बिझनेस ५ लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी १.४० लाख तसेच नवीन महिला अधिकरिता योजना ५ लाख मंजूर झालेल्या आहेत.

एन.एस.एफ.डी.सी यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये २० लाख व विदेशामध्ये ३० लाखापर्यत कर्ज मंजूर करण्यात येईल. अधिक माहिती करिता संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या,भंडारा येथे भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos