महत्वाच्या बातम्या

 चिखल तुडवत भर पावसात जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर


- प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व मत्सयबीज संवर्धन योजनेच्या कामाची पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज भर पावसात भंडारा तालुक्यातील जाख, गणेशपूर, डवा, मथाडी, खमारी या गावातील  प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, प्रधानमंत्री  मत्स्य संपदा योजनेतर्गत नविन तलाव बांधकाम योजनेच्या कामाची पाहणी केली. या दौ-यात तहसीलदार सोनकुसरे, जिल्हा कृषी अधिक्षक संगीता माने, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोंटागळे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय विभागाचे उमाकांत सबनिस उपस्थित होते.

गणेशपूर येथील  शेतकरी उत्पादक कंपनीला सकाळी साडेनऊच्या सुमारास कुंभेजकर यांनी भेट दिली. त्या कंपनीच्या क्लीनींग व ग्रेडींग युनीटला भेट देवून कंपनीच्या कामाची विस्तृत पाहणी केली. डव्वा येथील प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतर्गत शुभम वानखेडे या लाभार्थ्याच्या तलावास भेट दिली. बोटुकली निर्मीतीसाठी करत असलेल्या कामाची माहिती वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. बाजारात मागणी असलेल्या  माश्यांची पैदास करण्याच्या सूचना त्यांनी केली.

तर महादेव जिवतू मते यांच्या शेतातील  प्रधान मंत्री  कृषि सिंचन योजना व ठिबक सिंचना संचाची पाहणी केली. या शेतातील चवळी, लवकी, कारले या पिकांचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी शेतात केलेल्या नविन प्रयोगाची माहिती यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतर्गत कुंदा शेंडे यांच्या मथाडी येथील मत्स्य संवर्धन तलाव बांधकामाच्या कामाला भेट दिली. तलावात कार्प, सायप्रिनस माश्यांच्या प्रजातीचे संवर्धन करण्यात येत असल्याची माहिती लाभार्थी कुंदा शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर खमारी येथील तलाठी कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.





  Print






News - Bhandara




Related Photos