गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , एका उमेदवाराची माघार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
  गडचिरोली -चिमूर  लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी अपक्ष उमेदवार डॉ. एन.डी.  किरसान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून५  उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे  जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने कळविले आहे.

हे उमेदवार निवडणूक लढविणार 

- अशोक महादेवराव नेते 
 कन्नमवार वार्ड नं.२३ , चामोर्शी रोड, गडचिरोली ता.जि. गडचिरोली 
 भारतीय जनता पार्टी 
 दिलेले चिन्ह- कमळ,  

- डॉ. नामदेव दल्लुजी  उसेंडी 
यशोधरा निवास , शिवाजी नगर कॅम्प एरिया,गडचिरोली ता.जि. गडचिरोली
 इंडियन नॅशनल काँग्रेस.
 दिलेले चिन्ह- हात 

- हरीचंद्र नागोजी मंगाम 
 मु.इल्लुर पो. ठाकरी, ता.चामोर्शी जि.गडचिरोली 
 बहुजन समाज पार्टी.
 दिलेले चिन्ह- हत्ती, 

 नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)

- देवराव मोनबा नन्नावरे 
राजीव गांधी वार्ड,क्र. 4 वडाळा (पैकू ) ता. चिमूर जि.चंद्रपूर 
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
 दिलेले चिन्ह-कोट 

- डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे 
 मु.पो.भिसी, ता.चिमूर जि.चंद्रपूर
 वंचित बहुजन आघाडी. 
दिलेले चिन्ह- कप आणि बशी   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-28


Related Photos