महत्वाच्या बातम्या

 एक कुटुंब, एक बालक संकल्पना रुजवा : सीएस. डॉ. चिंचोळे


- जागतिक लोकसंख्या दिनाचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापूर येथे जागतिक लोकसंख्या दिन जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या हस्ते पार पडले.  

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, सरपंच, पुजा मानकर, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रृगारे, वैद्यकिय अधिकारी, डॉ. आशिष वाकडे, प्रा.आ. केंद्र, दुर्गापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश गेडाम, डॉ. अमित जैसवाल आदींची उपस्थिती होती.    

मार्गदर्शन करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी एक कुटुंब एक बालक संकल्पना रुजवा अन्यथा लोकसंख्या वाढत गेल्यास देश अधोगतीकडे जाण्यास वेळ लागणार नाही तसेच शासन विविध उपक्रम राबवित असून लोकसंख्या कमी करण्याकरीता प्रयत्न करीत आहे. जेणेकरुन सगळयांचे जीवन सुजलाम सुफलाम राहण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

डॉ. राजकुमार गहलोत यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी जीवनावर काय परिणाम होतो जसे मानवाच्या मुलभुत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले व लोकसंख्या नियंत्रणकरीता कुटंब कल्याण साधनांचा वापर करावा असे आवाहन केले. त्यासोबतच कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा  यावर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी केले. याप्रसंगी आशा स्वयंसेविका किरण दहिवले यांनी लोकसंख्या नियंत्रणावर आधारीत गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन आशा गटप्रर्वतक सारीका गेडाम यांनी तर आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रृगांरे यांनी मानले.





  Print






News - Chandrapur




Related Photos