महत्वाच्या बातम्या

 नव निर्मित शासकीय निवासी शाळेत सत्र


- २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासुन निशुल्क प्रवेश देणे सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली येथे नव निर्मित शासकीय निवासी शाळेत सत्र २०२३-२४ या शैक्षणिक सत्रा पासुन इयत्ता वर्ग ६ वी, ७ वी, व ८ वी निशुल्क प्रवेश देणे सुरु आहे. सदर शासकीय निवासी शाळेत प्रवेशीत विद्यार्थ्यांना निवास, शिक्षण, भोजन, गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सोयीसुविधा विनामुल्य उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय सुटीचे दिवस वगळून अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा (गोंडवाना सैनिक शाळे जवळ) गडचिरोली तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयास विनाशुल्क अर्ज उपलब्ध आहे. २५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

सदर शासकीय निवासी शाळेत प्रवर्ग निहाय प्रवेशाची टक्केवारी अनुसूचित जाती करीता ८० टक्के, अनुसूचीत जमाती करीता १० टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती करीता ०५ टक्के व विशेष मागास प्रवर्गाकरीता ०२ टक्के आणि अपंग प्रवर्गासाठी ०३ टक्के याप्रमाणे राहील. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos