पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू : चंद्रपूर जिल्ह्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना दक्षिण वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या अर्जुनी बिट एकारा कक्ष क्रमांक १५५/१५६ अंतर्गत रामपुरी पासून ४ किमी अंतरावर असलेल्या जंगल परिसरात 
 बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. जानकीराम शंकर भलावी (५०) असे मृतक इसमाचे नाव आहे.
मृतक जानकीराम , पत्नी व गावातील इतर काही जण सकाळच्या सुमारास गावाला लागून असलेल्या असलेल्या जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले होते. मृतक दुसऱ्या बाजूला मोहफुल वेचत असताना अचानक पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. त्यानंतर त्यांना एक किमीपर्यंत फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीला घटनास्थळी जानकीराम यांच्या पायातील चपला, कपडे अस्ताव्यस्त व फाटलेल्या अवस्थेत दिसून आले. तिने याबाबत आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली. शोध घेतला असता एक किमी अंतरावर जानकीरामचा मृतदेह आढळून आला. 
 घटनास्थळी दक्षिण वनपरिक्षेत्राचे अधिकारी नायगमकर, गरमळे, राऊत यांनी भेट दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-28


Related Photos