महत्वाच्या बातम्या

 भारतीय जनता पार्टीच्या वतीने टिफीन सेवाग्राम येथे बैठक


- मोदी सरकारच्या यशस्वी कार्यकाळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची : खा. रामदास तडस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या कार्यकाळाला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य भाजपतर्फे मोदी ०९ महा-जनसंपर्क अभियान देशभर राबविले जात आहे. महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी देवळी विधानसभेच्या वतीने सेवाग्राम येथे टिफिन सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमात खा. रामदास तडस, देवळी विधानसभा निवडणूक प्रभारी राजेश बकाने, जिल्हा महामत्री मिलींद भेंडे, माजी अध्यक्ष नाना ढगे, सरपंच सुनिता ढवळे, राहुल चोपडा, नंदकिशोर झोंटीग, दशरथ भुजाडे, किशोर गवाळकर, विवेक भालकर, किशोर चौधरी, गौरव गावंडे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या घरून टिफीन आणून सामुहिक भोजन करण्यात आले व पंतप्रधानांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळातील उपलब्धीवर चर्चा करण्यात आली.

यावेळी खा. रामदास तडस म्हणाले की, अशा प्रकारच्या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होते. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. गत ०९ वर्षामध्ये गरीब, महिला, युवा यासाठी महत्वाचे कार्य झालेले आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर केंद्रात दोनदा मोदी सरकार स्थापन झाले. कार्यकर्त्यांनीच लोकांमध्ये जाऊन मतांच्या बदल्यात चांगले सरकार देण्याचे आश्वासन दिले. मोदी सरकारने ती आश्वासने पूर्ण केली आहेत. आता मोदी सरकारच्या यशस्वी कार्यकाळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे यावेळी खा. तडस म्हणाले.





  Print






News - Wardha




Related Photos