परीक्षेत गैरप्रकार, दोन विद्यार्थ्यांना एक वर्षाचा कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली 
:   एकाच्या नावावर दुसर्‍याने परीक्षा दिल्याप्रकरणी  मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम.पाटील यांच्या न्यायालयाने दोघांना प्रत्येकी १ वर्षाचा कारवास व ५ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
 सागर वसंत सरपे (१९) रा. चामोर्शी व मनिष राहुल वनकर (१९) रा. मुल (जि.चंद्रपूर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
 प्राप्त माहितीनुसार २७ नोव्हेंबर २०१५ रोजी शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर  अभियांत्रिकी ड्राईंग सेमिस्टर १  या विषयाचा पेपर सुरू होता.  आरोपी  मनिष राहुल वनकर या विद्यार्थ्याचा पेपर असतांना त्याचा पेपर सागर वसंत सरपे हा सोडवितांना आढळून आला.
 त्याच्या आधार कार्डची तपासणी केली असता सदर बाब लक्षात आली.  याबाबत सह्योगी प्राध्यापक डॉ.गोविंद वाघमारे  यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले.
काल  २७ मार्च  रोजी  मुख्य न्यायदंडाधिकारी पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुराव्यावरून दोन्ही आरोपींना प्रत्येकी १ वर्षाचा कारावास व ५ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड.योगीता राऊत यांनी काम पाहिले.कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सरपे यांनी काम पाहिले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-28


Related Photos