महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस : गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्यातील काही जिल्ह्याच चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. भंडारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

गेल्या ४८ तासापासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे २५ गेट उघडले आहेत. धरणातून ९७ हजार २३२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार आणखी गेट उघडण्याची शक्यता आहे. 

भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून पाण्याचा सातत्याने विसर्ग होत असल्याने आणि सुरू असलेल्या पावसाने भंडाऱ्याची जीवनदाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र आता दुथडी भरून वाहू लागले आहे.

मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी दथडी भरुन वाहत आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. 





  Print






News - Bhandara




Related Photos