महत्वाच्या बातम्या

 कृषी मेळावा अहवाल 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : आज १० जुलै २०२३ रोजी पोलीस अधीक्षक निलोत्पल, गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र मन्नेराजाराम हद्दीतील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासाकरीता पोलीस प्रशासनाने ठरविलेल्या उद्दिष्टामधील एक टप्पा म्हणून पोलीस मदत केंद्र मन्नेराजाराम येथे भव्य कृषी मेळावा आयोजित करण्यात आला.

सदर मेळाव्याचे अध्यक्ष प्रभारी अधिकारी उमेश कदम प्रमुख अतिथी अयुब खान पो.नि. सीआरपीएफ ९ बटालियन, पोउपनी नवनाथ पाटील पोमके मन्नेराजाराम, पोउपनी धात्रक पोउपनी ढाले एसआरपिएफ वडसा ग्रुप, कोरेत सरपंच मन्नेराजाराम, डॉ. विठ्ठल ताले आरोग्य अधिकारी मन्नेराजाराम, अनमोल चावरे मार्केटिंग एक्झुक्युटीव पीएम किसन कार्ड तसेच गावातील पोलीस पाटिल, गाव पाटील, प्रतिष्ठीत नागरिक कृषी मेळाव्याला हजर होते. सरपंच कोरेत यांच्या हस्ते शहीद बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पोउपनि उमेश कदम यांनी पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. सदर मेळाव्यास उपस्थित नागरिकांना पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची ओळख या विषयावर मार्गदर्शन केले तसेच शेतीपूरक जोड व्यवसाय त्यासाठी सदर भागात उपलब्ध अनुकूल बाबी त्यातून त्यांचा आर्थिक विकास व समाजाच्या प्रवाहात येण्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन  करण्यात आले. 

मेळाव्यामध्ये १) फावडे = ४०, २) फळझाडे = १००, ३) PM किसान EKYC = ७०, ४) पोस्टल खाते = ६०, ५) हेल्थ कार्ड = १५, ६)ई श्रम कार्ड = ०५, ७) पॅन कार्ड = १८, ८) सात बारा = ४५  इ. साहित्य वाटप करण्यात आले. 

सदर मेळाव्याला २०० ते २५० नागरिक उपस्थित होते. मेळाव्यात उपस्थित ३० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर मेळाव्याला उपस्थित नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. 

सदर मेळावा यशस्वी करणेसाठी पोलीस स्टेशन मन्नेराजाराम अधिकारी/अंमलदार तसेच एसआरपिए/सीआरपीएफ चे अधिकारी/अंमलदार यांनी सहकार्य करून कृषी मेळावा शांततेत पार पाडण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos