महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : रत्नापूर ग्रामपंचायतील महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पारीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे १५ सदस्यीय ग्रामपंचायत कार्यरत आहे. सिंदेवाही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून रत्नापुर ओळखली जाते. रत्नापुर येथील सरपंच सदस्यांना विश्वसात घेत नाही. मनमानी कारभार करतात असा ठपका ठेवत या १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मधील १३ सदस्यानी तहसिलदार  सिंदेवाही यांच्याकडे विद्यमान सरपंच विरुध्द अविश्वास प्रस्ताव सादर केला.

त्यानुसार तहसिलदार तथा तालुका दंडधिकारी यांनी १० जुलैला दुपारी २ वाजता सभा ठेवण्यात आली. आणि त्यात महिला सरपंचयावर १३ विरुद्ध १ असा ठराव पारित करण्यात आल्याने सरपंच कविता सावसाकडे यांना पायउतार व्हावे लागले. यावेळी ग्राम पंचायत सभागृहात पार पडलेल्या अविश्वास ठरावाच्य बाजूने १३ सदस्य आणि ज्यांचेवर अविश्वास ठराव होता. त्या विद्यमान सरपंच कविता सावसाकडे यांनी मतदान केले. सर्व सदस्यांनी हात वर करून मतदान करणे. या प्रकिये नुसार घेण्यात आले तर १ ग्राम पंचायत सदस्य  अनुपस्थित होते. १३ विरुद्ध १ असा ठराव पारित झाला. मुंबई ग्राम पंचायत अधीनियम कलम ३५अन्वये सर्व कायदेशीर प्रकीया पार पाडण्यात आली. व संरपच विरुद्ध अविश्वास ठराव पारीत करण्यात आला. 

यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून तहसिलदार सिंदेवाही योगेश शिंदे, लिपीक युवराज मेश्राम, ग्राम विकास अधिकारी नरेंद्र वाघमारे, तलाठी संदीप आखरे आदी उपस्थित होते.

कोणतीही गावात अनुचीत घटना घडु नये म्हणून पी.एस.आय. सागर महल्ले यांच्या सोबत पोलिस कर्मचारी उपस्थीत होते. कोणतीही घटना न घडता सर्व प्रकीया शांततेत पार पडली. 





  Print






News - Chandrapur




Related Photos