महत्वाच्या बातम्या

 नगरपरिषद शाळेचे शिक्षणाचा कंत्राट खाजगी शिक्षण संस्थेला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : नगरपरिषद शाळेचे शिक्षणाचा कंत्राट खाजगी शिक्षण संस्थेला देण्याचे कट नगर परिषद द्वारे करण्यात येत आहे. त्याला विरोध करत आम आदमी पार्टी बल्लारपूर ने निवेदन देऊन ४८ तासात नगर परिषद ने योग्य पावले उचलले नाही तर आक्रमक भूमिका घेण्याचे इशारा देण्यात आले आहे. 

यंदाच्या सत्रात बल्लारपूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या विद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्रि-प्राथमिक शाळा सुरू करण्यात येत आहेत. परंतु या शाळांचे व्यवस्थापन चालविण्याचे कंत्राट एका खाजगी शिक्षण संस्थेच्या मालकाला दिले गेले आहे.

यामध्ये प्रत्येक वर्गात फक्त १० लक्की ड्रा बीपीएल धारक बालकांना मोफत प्रवेश मिळेल व इतरांना वार्षिक ३५०० रूपये शुल्क द्यावे लागेल. या निर्णयावर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. एका खाजगी शिक्षण संस्था चालकाला नगरपरिषद शाळांचे कंत्राट दिल्या गेल्याने तो आपल्या खाजगी शाळेला जास्त फायदा पोहचविण्याचा प्रयत्न करणार नाही का?

 जेव्हा शहरातील प्रत्येक नागरिकांकडून घर टॅक्स मध्ये शिक्षण कर आकारण्यात येत आहे, तर मग नगरपरिषद शाळांमध्ये गरीबांच्या मुलांकडून ३५०० रु वार्षिक शुल्क घेणे, कितपत योग्य आहे? नगरपरिषदेत कोणतेही जनप्रतिनिधी नसतांना शिक्षणाच्या बाजारीकरणाचा हा निर्णयाचा ठराव कसा झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

 यासह आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थित उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांना खाजगी संस्था चालकाला दिलेले कंत्राट रद्द करणे व इंग्रजी माध्यमाचे मोफत शिक्षण नगरपरिषदेच्या मार्फत देण्यात यावे या संदर्भात निवेदन दिले. यासह ४८ तासांमध्ये नगरपरिषदेने यावर योग्य पावले उचलली नाही तर पक्षातर्फे आक्रमक भूमिका घेण्यात येणार असा इशारा देखील दिला.

यावेळेस जिल्हा संघटनमंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सय्यद अफजल अली, सचिव ज्योति बाबरे, शहर संघठनमंत्री रोहित जंगमवार, शहर प्रवक्ता आसिफ शेख, महिला अध्यक्ष किरण खन्ना, युथ अध्यक्ष सागर कांबळे, बेबी बुरडकर, पप्पू श्रीवास्तव, अलिना शेख, महेंद्र चूनारकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos